Thursday, October 27, 2016

*मिञानो!!*

आज *भारतीय नेपोलियन राजराजेश्वर अलाजिबहाद्दूर, अपराजित यशवंतराव होळकरांची जयंती...  त्यानिमित्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏  *यशवंतराव*🙏

यशवंतराव तूमच्या माणसांचं
ईमान कुञ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.
वाटत नाही त्यांच्यासारखा
इतिहासात कोणी स्वामीनिष्ठ आहे.


वाईट वाटते आज आम्ही
मालकासाठी स्वकियांवर भुंकतो आहे
प्रश्न पडतो तरीही आम्ही
स्वतःला तुमचेच वंशज मानतो आहे.

लाज वाटत असेल यशवंतराव तुम्हाला
रक्त माझं  एवढं कसं बदललं
माझ्या गेल्यानंतर प्रस्थापितानी
यांना इतकं कस सडविलं.

विसरलो होतो यशवंतराव आम्ही
तुमचा तो अद्वितीय पराक्रम ,
आज माञ आदर्श तुमचा
आम्हा खुणावतोय यशाचा मंञ.

चिंता करु नका यशवंतराव
प्रस्थापित स्वामिनिष्ठाचे
दिवस आता भरलेले आहे
त्याच्याच पोटी तुमचे छावे जन्मले आहे.

धीर धरा यशवंतराव आता
दिवस तुमचेच येणार आहे.
स्वामिनिष्ठ धनगराची जागा
तुमचेच स्वाभिमानी छावे घेणार आहे.
तूमचेच स्वाभिमानी छावे घेणार आहे.......

🙏 *डाँ प्रभाकर लोंढे गोंदिया*🙏

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment