Thursday, October 27, 2016

धनगर बांधवानो !!!
आपण गुलाम आहात की स्वाभिमानी!!!!            
 ---------------------------------------    
    निमित्त माञ राजमातेची जयंती !!!!    
  ----------------------------------------------  


आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रस्थापितांना चिंता पडली आहे ती राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीची.. प्रत्येक राजकीय पक्क्ष त्याआधारे आपला जनाधार प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणार आहे..  यामध्ये  धनगरांशी गद्दारी करणारी मनुवादी बी.जे. पी पक्ष अग्रेसर आहे. त्याला व मुख्यमंत्री यांना आपण केलेल्या पापावर पांघरून घालायच आहे..  धनगरांचे आम्हीच उद्धारक आहोत हे दाखावायच आहे.  त्यासाठी बीजेपी मध्ये काम  करणाऱ्या  नेत्यांचा वापर करणार आहे..  कदाचित  या जयंती नंतर  बीजेपी तसेच सरकार कडून धनगरांपैकी एक दोघांना मोठा राजकीय लाभ सुध्दा होईल हे  निश्चित !     यासाठी चौंडी मध्ये  बीजेपीकडून माहोल बनविला जाईल....                          
            पण लक्षात असू द्या...    "ज्या मनगटात बळ, बुध्दी , चातुर्य असते, तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनु शकतो "  हे जगाला सांगणाऱ्या  राजमातेची जयंती साजरी करायला निघाले आहात....  तिचे वंशज असल्याचे कृतीतुन या प्रस्थापिना दाखवुन देणे हेच आपले चातुर्य असणार आहे...                            आदरनिय महादेवराव जाणकर साहेबांनी  राजधानी मध्ये जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला ...  याचे सर्व धनगर बांधवानी स्वागतच केले पाहीजे... कारण तो राजधानी मध्ये आपला स्वाभिमान प्रदर्शित करण्याचा निर्णय आहे अस मला वाटते आहे. (मी काही रासप कार्यकर्ता नाही).  यामध्ये धनगरांची उपस्थिती राजकीय सत्तेच्या दृष्टीने राजमातेचा आदर्श  घेत स्वाभिमानाच्या लढाईतील एक पाऊल ठरणार आहे...... त्याची दखल संपूर्ण व्यवस्था घेणार आहे..... यामध्ये पहिलेच महादेव असलेले महादेव जाणकर...  पुन्हा महादेव पुन्हा बणणार ही प्रस्थापितांप्रमाणे कोणाला वाटृत असेल... तर ती भिती काढून टाका.  कारण एकटे महादेव जाणकार जेवढे मोठे होणार तेवढाच  फायदा इतर धनगर नेत्यांचा हौणार आहे.....   मा. शिंदे साहेब व इतर नेत्यांना मोठे केले जाईल ते केवळ  धनगर मताना रासप कडे न जावु देण्यासाठी केले जाणार आहे........    
जयंतीला  चौंडीत  जावुन स्वतःला भक्त सिद्ध करण्यापेक्षा  मुंबईत येवुन अहील्यामातेच्या विचारांचा  अनुयायी घोषित करा........            

 शेवटी एक लक्षात   ठेवा ... भक्तांची फसवणूक होवु शकते..  अनुयायांची नाही...अनुयायी भक्ताना वाचवु शकतो....कारण अनुयायी हा विचारांचा असतो....                        धनगरांची फसवणूक आजपर्यंत  भक्तांमुळे झालेली आहे.........        
-----------------------------------------      
  धनगरांच्या राजकीय जाणीव जागृती व नेतृत्वाचा अभ्यासक.........    
--   डाँ प्रभाकर  लोंढे...   गोंदिया -'चंद्रपूर
--++++-----------------------------------------

No comments:

Post a Comment