Monday, May 7, 2018


कृपया शांतपणे पुर्णतः​ वाचावे​.
🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹👫🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनो!!तुमच्या पक्षांना धनगरानी मतदानच का करावे??*
_______________________________
                 *डॉ.    प्रभाकर लोंढे*
------------------------------------------------
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे राजकीय पक्ष सातत्याने राजकीय सत्तेचा आस्वाद घेत आलेले आहेत. अशा या राजकीय सत्ता भोगवादी पक्षांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धनगर सारख्या बहुसंख्य, साध्या, भोळ्या जमातीचा बळी दिलेला आहे. या जमातीत कोणताही नेता हा सदासर्वकाळ सत्ताधीश राहणार नाही किंवा निर्माणच होणार नाही, याचा त्यांनी सातत्याने विचार सोबतच कसोशीने प्रयत्न केलेला आहे. व ही बाब आज धनगरांमधील सर्वांनाच कळून चुकलेली आहे.  याचे अनुभव या पक्षातून काम करणारे धनगर नेते, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आजही सर्व प्रस्थापित पक्ष भावी काळात सुद्धा या धनगरांचा वापर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे.
          असे असताना अलीकडील काळात धनगर जमातीमध्ये विकसित झालेली स्वाभिमानाची, अस्मितेची भावना, अन्यायाविरुद्ध​ तरुणांमध्ये खदखद निर्माण करत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे मनसुबे या जमातींच्या तरुण वर्गामध्ये दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांनी केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न हा तरुण वर्ग करीत आहे. त्यातूनच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांना धनगरानी मतदानच का करावे ??       
           कोणी म्हणेल, याशिवाय दुसरे पक्ष तरी कोणते?? या प्रस्थापित पक्षांनी तुमचं एवढं काय बिघडवलं.? आम्ही, आमचे आदरनीय नेते त्या पक्षात आहे, (कोणत्या पक्षात राहायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे) आमच्या दोन/तीन पिढ्यांपासून या पक्षात काम करीत आहे. आपण धनगरांनी या पक्षांना सोडून कधीच मतदान केलं नाही.(याचाच तर माजं या पक्षांना आलेला आहे) त्यामुळे आमच्याकडे पाहून,  तरी या पक्षांना मतदान करा.  *पण प्रश्न येतो का??  कोणासाठी???  कशासाठी????*
       कोणत्याही पक्षातील सच्चा धनगर नेत्यांना मतदान करणे, त्यांना जपणे भलेही धनगरांचे आद्यकर्तव्य आहे व धनगर नि:संदेह ते पार पाडेल, यात शंकाच नाही. परंतु कोणी म्हणेल,धनगर बांधवांनो!आमच्या या प्रस्थापित पक्षांना मतदान करा. तर  मी म्हणेन,तर ते शक्य नाही, कारण तो अधिकार या पक्षांनी गमावलेला आहे. हे चुकीचे वाटत असेल तर ते स्पष्ट (टिका नाही) करण्याचा अधिकार प्रत्येकालाच​ आहे.
                वास्तविक परिस्थिती पाहता लक्षात येते की, हे प्रस्थापित पक्ष आमच्या धनगर नेत्यांना उमेदवारीच देत नाहीत(इतिहास). या पक्षांमधून आजपर्यंत आमचा कोणताही नेता मोठा होऊ दिला नाही (वैयक्तिक पातळीवर स्वतःला कोणी मोठा समजत असेल तर त्यांच स्वागत व आम्हाला नक्कीच अभिमान.) या प्रस्थापित पक्ष्यांमध्ये काम करणाऱे धनगर नेते सुद्धा धनगर प्रश्नावर आपली/ पक्षाची सार्वजनिक भूमिका सार्वत्रिकरित्या स्पष्ट करताना दिसत नाही. (केली असल्यास प्रसार होणे अत्यावश्यक) . या पक्षांचे अस्तित्वच महाराष्ट्रातील धनगरांच्या सत्यानाशातूच बलशाली झालेलं आहे. त्यामुळे धनगरांना न्याय देवून हे पक्ष स्वःताच्या पायावर कुर्हाडी मारुन घेणार नाही हे  त्रिकालाबाधित सत्य!!!!
                     त्यामुळे या पक्षांच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पर्याय शोधून स्वाभिमानाच्या​ भूमिकेत यापुढे निवडणूकी​त उतरण्याची मानसिकता धनगर तरुणांमध्ये दिसून येत आहे. त्याला विरोध करणारे सुध्दा फार थोडे आहे परंतु त्यांनी अजून पर्यंत आपली भूमिका(अजेंडा) स्पष्ट केलेली नाही. तात्विक दृष्टीकोनातून तरी अजून पर्यंतचा त्यांचा विरोध सार्वजनिक केलेला नाही. त्यानी तो विरोध तात्विक दृष्टीकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला तरी तो या प्रस्थापित पक्षांच्या समर्थनाचा असूच शकत नाही.
        अशा परिस्थितीत या प्रस्थापित पक्षांमध्ये काम करणाऱ्या धनगर राजकीय नेते व कार्यकर्त्यांची फार मोठी गोची होतांना दिसून येते.  त्यामुळे ते आज आपली नक्की भूमिका व्यक्त करीत नसले तरी  त्यांनी आपली जमाती संबंधी भावी काळासाठी भूमिका स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे. त्याआधी जमातीच्या प्रश्नासंबंधी आपल्या पक्षाची भूमिका काय? हे प्रथमतः सार्वजनिक करणे आवश्यक आहे. तरच....................
            धनगरांच्या आरक्षणासारख्या घटनादत्त अधिकारासंबंधी हे राज्यघटनेचे रखवाले? म्हणविणारे  हे राजकीय पक्ष कधीच सार्वजनिक भूमिका घेताना दिसत नाही. कधी रस्त्यावर उतरतानाही दिसत नाही.
    त्यामुळे यापुढे 2019 या निवडणुकीमध्ये प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनी केवळ स्वतःच्या मतदारसंघात स्वतःला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे परंतु इतर मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाच्या गैरधनगर उमेदवारांसाठी मतदानाची अपेक्षा करू नये. पक्षश्रेष्ठींचा दबाव येत असेल तर पक्षश्रेष्ठींना सुद्धा आपल्या पक्षा संबंधात जमातीची भूमिका स्पष्ट करून सांगावी, जेणेकरून त्याचा परिणाम त्यांच्या लक्षात येईल. पक्षश्रेष्ठी त्यांच्या पक्षात असलेल्या धनगर नेत्यांना आपल्याकडे खेचून ठेवण्यासाठी  त्या पक्षातील  धनगर नेत्यांच्या मागण्या अवश्य मान्य करतील. कारण पक्षातून हाकलून देण्याची भीती आज धनगर नेत्यांनी तरी बाळगू नये. कारण आज यापैकी प्रत्येक पक्षाला धनगर अस्मितेची कल्पना आलेली आहे. त्यामुळे *धनगर नेत्यांना पक्षातून ढकलण्याचा निर्णय घेण्याची रिस्क आजतरी असा कोणताही पक्षश्रेष्ठीं घेणार नाही* . घेतल्यास त्यांना महागात पडल्या शिवाय राहणार नाही. ही धनगर नेत्यांची दहशत बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये व पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
            म्हणून या प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनी आपल्या पक्षाला 2019 निवडणुकीमध्ये धनगर मतदान मिळेल अशी आशाही बाळगू नये, शक्य तो तसे प्रयत्नही करू नये. गरज पडल्यास प्रयत्नांचा आभास मात्र निर्माण करता येतील परंतु आपल्या पक्षातील अथवा इतर पक्षांतील धनगर नेतृत्व कसे निवडून येईल याचा विचार मात्र नक्की करावा. *धनगर  कोणत्याही पक्षात का असेना, काही मतभेद का असेना परंतु त्याला 2019 या निवडणुकीमध्ये मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा.* यामुळे भलेही तुमच्या पक्षाचे उमेदवार पडतील पण धनगर जमातीचे उमेदवार निवडून येतील. विधिमंडळात धनगरांची संख्या वाढतील आणि ख-या अर्थाने धनगरी स्वाभिमान प्रस्थापितांना कळून चुकल्या शिवाय राहणार नाही........
*धनगर एकता-- धनगर भाग्यविधाता !!!*
*एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बरं वाटल्यास शेअर करावे

No comments:

Post a Comment