धनगर नेत्यांनो! आरक्षणाच्या मुद्द्यावर जमातीला भ्रमित करू नका.
-----------------------------------------
डॉ. प्रभाकर लो़ंढे
------------------------------------------
धनगर आरक्षण हा मुद्दा विशेषतः भावनिक असल्यामुळेच सुरुवातीपासूनच त्याच्या आधारे अनेकांनी मते घेण्याच्या प्रयत्न केला आहे .राजकीय ताकद वाढवण्याच्या/ दाखवण्याच्या दृष्टीने त्याचा वापर केला आहे. हे विशेषतः गैरधनगर व धनगर नेत्यांकडून झालेले आहेत. त्यामुळेच आतापर्यंत आमचा हा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. यापुढे धनगर नेत्यांनी तरी त्याला जमातीची एक गंभीर समस्या माणून त्यावर इलाज करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यास आपली संपूर्ण ताकद लावण्यास काही हरकत नाही परंतु घटनात्मक आरक्षणाच्या नावावर, त्याच्या अंमलबजावणीच्या नावाने सामान्य धनगर जनांपर्यंत जाणे व त्यांना भावनिक करून मोर्चे काढून, मेळावे घेऊन राजकीय पक्षांसमोर किंवा पक्षश्रेष्ठींपुढे ताकद दाखवण्यासाठी सामान्य धनगरांचा वापर थांबविणे हेच जमातीच्या हिताचे असेल. याचा अर्थ शुद्ध सामाजिक भावनेतून मोर्चे काढण्यास, मेळावे घेण्यास कोणाचीही हरकत असूच शकत नाही.
सामान्य धनगर रानावनात आपला व्यवसायशी/जमातीशी प्रामाणिक राहून तुमच्या माझ्यासारख्याचच ऐकणार व करणार हे निश्चित असल्याने त्याच्याशी वागत असताना केवळ प्रामाणिकतेनेच वागणे हेच अत्यावश्यक आहे. नाहीतर आपणा सर्वां संबंधीचा अविश्वास निर्माण होईल व प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला सुद्धा जमात जवळ येऊ देणार नाही. जमातीचे प्रश्न जसेच्या तसे राहतील. राजकारणात सत्तेची पोळी भाजणारे पोळी भाजत राहतील व जमातीच्या मात्र रानावनात डोंगर दर्यात आरक्षणाची आस लावून पिढ्यान पिढ्या बरबाद होतील. अपवाद फक्त भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाही.
अनेक नेते, सरकारे येतील, आश्वासने देऊन जातील. परंतु सरकारला जाब विचारणारी पिढी निर्माण होणार नाही, आणि जाब विचारला जात नाही किंवा जाब विचारला जाण्याची भीती सरकारला वाटत नाही. तोपर्यंत तुमचे प्रश्न सोडवण्याची गरज सरकारला वाटत नाही. म्हणून धनगर नेत्यांपैकी जे सरकारमध्ये किंवा सत्तारूढ पक्षामध्ये असेल त्यांनी सरकारला जमातीसाठी पोषक निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे आणि सरकारबाहेर असेल तर शुद्ध अंतःकरणाने सरकारवर दबाव निर्माण होतील, असेच उपक्रम राबवावे.
खरंच राजकारण हा खेळ आहे. पण जमातीच्या नेत्यांनी जमातीच्या भावनाशी/हिताशी खेळण्याचा खेळ नक्कीच नाही. राजकीय व्यवस्थेत सरकार दरबारी सत्तेचा खेळ चालू असताना तिथेसुद्धा जमातीचा नेतृत्वाचे दोन गट असले पाहिजे एक सत्तारूढ गट व दुसरा विरोधी गट. सत्तारूढ गटाने सत्तारूढ पक्षाला सत्तेत राहून जमात हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडावे. तर विरोधी पक्षात असणाऱ्या सर्वच जमात नेतृत्वानी जमातीमध्ये सरकारचे धोरण किती चुकीचे आहे हे दाखवावे. त्यासाठी मोर्चा, उपोषणाचे दबाव तंत्र चालेल.
सत्तारूढ पक्षात काम करणाऱ्या जमात नेतृत्वांनी सरकारचे धोरण जमातीसाठी किती पोषक आहे हेच सांगावे, सत्ता हातात असल्याने सत्तेच्या भरोशावर जास्तीत वापर जमाती साठी करावा (सत्ताधारी यांना मोर्चे काढण्याची गरज नाही.) जेणेकरून जमातीला राजकीय शिक्षण मिळून जमात विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचून योग्य तो निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल, त्यावेळेस प्रत्येक नेता खरा कोण? खोटा कोण? हे सांगण्याची गरजच पडणार ब जमातीचे वर्चस्व येथील प्रस्थापित व्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे धनगर जमातीचे सर्वच प्रश्न सरकार ला वाऱ्यावर सोडता येणार नाही.
धनगर प्रश्नावर निर्णय घ्यावाच लागेल अशा प्रकारचा दबाव सरकारवर निर्माण होऊन आपले सर्वच प्रश्न हे सोडवण्यासाठी आपोआप पोषक वातावरण निर्माण होईल. त्यासाठी मात्र प्रत्येक नेत्याने मी कोण आहे, मी सत्तारूढ पक्षात काम करत आहे की विरोधी पक्षात काम करतो आहे हे ठरवूनच नंतर जमातींच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. त्यासंबंधी आपल्या भूमिका व कार्य निश्चित करावे, असं असेल तरच आपल्या हेतूसंबधी कोणीही संशयी घेणार नाही. धनगरांच्या प्रत्येक नेत्याची सामाजिक प्रतिमा उंचावल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक प्रतिमा उंच असलेल्या धनगर नेत्यांचा येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये प्रभाव दबाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. व धनगरांच्या आरक्षणाच्या प्रश्नासोबतच इतर कोणतेही प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाही. त्यादिवशी धनगर सारखी राज्यकर्ती जमात कोणत्याही प्रश्नासाठी भीक मागताना दिसणार नाही.
म्हणून धनगर नेत्यांनो! दृष्टिकोन बदला जग बदलेल. याचा अर्थ सर्वच धनगर नेत्यांचा दृष्टिकोन हा घातक आहे, अशातला भाग नाही पण जमातीचा इतिहास, आजची काही नेत्यांचे धोरण पहाता अशा प्रकारच्या लेखनाची मला आवश्यकता वाटली म्हणूनच असा हा लेखन प्रपंच केला आहे. यामध्ये कोणाला काही आक्षेप असल्यास माझ्याशी चर्चा करावी.
एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:
Post a Comment