Tuesday, September 18, 2018

जीवनार्थ

जीवनार्थ

दगड झालोच तर
त्या मंदिराचा होईल.
गरज पडलीच तर
शेंदूर फासून घेईल..

माणूस आहे मी,
माणूसकी साठी
मला हवा तो
आकार स्वत:ला देईल.

पुनर्जन्माच्या त्या
 काल्पनिक दुनियेत
पुनर्जन्म झालाच तर
माणूस म्हणूनच घेईल.

मात्र हे करण्याआधी
जीवनभर
जिवंत​ माणूस म्हणून
मनसोक्त जगून घेईल.

डॉ प्रभाकर सीमा लोंढे
      गोंदिया चंद्रपूर
९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment