Friday, September 28, 2018

हुंकार समतेचा

हुंकार समतेचा

मरणाची तमा नाही
या अथांग अमर जगण्याला.
पडू दे! सडू दे!
वा तुडवू दे देह माझा,
पर अंकुर येवू दे विचाराला..

स्वास देहाच्या
समागमातून
फुटू दे वाचा
शोषित-उपेक्षितांच्या वेदनेला.
विचारांचे हुंकार फुटतील
साथ देत विचाराला.

या नश्वर देहाच्या
समाप्ती पुर्वी
नष्ट होवू दे
या जालिम विषमतेला.
समानतेचा सुगंध फुटतील
या देहाच्या मरणाला....

No comments:

Post a Comment