Friday, September 28, 2018

लगीनगाठ

लगीनगाठ
आहोत साक्षीदार आम्ही
अनमोल या क्षणांचे
फुलावे बहरावे आपण
असे सुभाशिष सर्वांचे.


जगावे बेधुंद  जीवनात
कधीही क्षण नसावे दुःखाचे
सुखात जरी नसलो साथ
दुःखात स्मरण असावे सर्वांचे

फडफडू द्या पंख अपुले
सरभरल्या संसाराचे.
उदंड जगा आयुष्यमान ते
सार्थक व्हावे जीवनाचे.

स्वीकारा पतीपत्नी उभयता
व्हावे आदर्श समाजाचे.
अभिमान वाटावा आम्हा
आम्ही साक्षीदार आपल्या लग्नाचे    

No comments:

Post a Comment