इशारा बैलांचा
येथेही नंदी, तेथेही नंदी.
सगळीकडे नंदीच नंदी.
देशामध्ये सर्वत्र पसरली
महाभयंकर आर्थिक मंदी.
मधातच आली तुमची
त्या जुन्या नोटांवर बंदी.
सगळ्यांनाच झाला त्रास
राहील कसे ते आनंदी.
देशात लागू झाली म्हणे
संपूर्ण सर्वत्र दारूबंदी.
तरी पोळ्यामध्ये माणूस डोले
जसा मोठा बैल नंदी.
येथे रोजच महागत आहे
खत, बियाणं, सोनं चांदी.
जगावं की मरावं यातच
शेतकरी मरतो विचारामंदी
जास्त पीक व्हावं म्हणून
त्यानं शेतासह पेरली बांधी.
माझ्या मेहनतीने पीकविलं सर्व,
वाढ झालीय राष्ट्रीय उत्पन्नामंदी
या पोळ्याच्या सणानिमित्त नं
मी सांगून देतो सर्व सज्जनामंधी
तुम्ही नका पडू माझ्या फंदी.
शेतकऱ्यांना वाचवता की नाही
सांगा! याच पोळ्या मंदी..
नाहीतर दिसेल तुम्हा
आम्हा बैलांची जात किती गंधी!
येथेही नंदी, तेथेही नंदी.
सगळीकडे नंदीच नंदी.
देशामध्ये सर्वत्र पसरली
महाभयंकर आर्थिक मंदी.
मधातच आली तुमची
त्या जुन्या नोटांवर बंदी.
सगळ्यांनाच झाला त्रास
राहील कसे ते आनंदी.
देशात लागू झाली म्हणे
संपूर्ण सर्वत्र दारूबंदी.
तरी पोळ्यामध्ये माणूस डोले
जसा मोठा बैल नंदी.
येथे रोजच महागत आहे
खत, बियाणं, सोनं चांदी.
जगावं की मरावं यातच
शेतकरी मरतो विचारामंदी
जास्त पीक व्हावं म्हणून
त्यानं शेतासह पेरली बांधी.
माझ्या मेहनतीने पीकविलं सर्व,
वाढ झालीय राष्ट्रीय उत्पन्नामंदी
या पोळ्याच्या सणानिमित्त नं
मी सांगून देतो सर्व सज्जनामंधी
तुम्ही नका पडू माझ्या फंदी.
शेतकऱ्यांना वाचवता की नाही
सांगा! याच पोळ्या मंदी..
नाहीतर दिसेल तुम्हा
आम्हा बैलांची जात किती गंधी!
No comments:
Post a Comment