अंधार फार झाला
जगतो आहे अन्यायाचा भार घेवून
दुराचारी अधमाच्या दुनियेत.
आहेत उभे सत्य, विवेक, सद्बुध्दी
गुन्हेगारांच्या वांझोट्या आमसभेत.
विवेक-अविवेक, सत्य-असत्य
भावंड कधी असे जुळे झालेत.
सगळेच कसे अंध दिव्यांग येथे
अविवेकी या अधमांच्या दुनियेत.
कधी मिळेल न्यायाला न्याय,
ऐकू तडे अन्यायाला गेलेत.
येईल कधी दिवस तो
सर्व म्हणेल, आता अती झालेत!
होवू द्या अन्याय कितीही,
वा निर्माण होवू द्या, साम्राज्य त्याचे.
मेनबत्ती मात्र जळत राहील
सत्य लढे लढत अस्तित्वाचे.
कोणी म्हणेल मेनबत्ती विझली
आता अंधार फार झाला.
कळून चुकेल तेव्हा त्याला,
तो काळ निघून गेला.
तो काळ निघून गेला...
राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३
जगतो आहे अन्यायाचा भार घेवून
दुराचारी अधमाच्या दुनियेत.
आहेत उभे सत्य, विवेक, सद्बुध्दी
गुन्हेगारांच्या वांझोट्या आमसभेत.
विवेक-अविवेक, सत्य-असत्य
भावंड कधी असे जुळे झालेत.
सगळेच कसे अंध दिव्यांग येथे
अविवेकी या अधमांच्या दुनियेत.
कधी मिळेल न्यायाला न्याय,
ऐकू तडे अन्यायाला गेलेत.
येईल कधी दिवस तो
सर्व म्हणेल, आता अती झालेत!
होवू द्या अन्याय कितीही,
वा निर्माण होवू द्या, साम्राज्य त्याचे.
मेनबत्ती मात्र जळत राहील
सत्य लढे लढत अस्तित्वाचे.
कोणी म्हणेल मेनबत्ती विझली
आता अंधार फार झाला.
कळून चुकेल तेव्हा त्याला,
तो काळ निघून गेला.
तो काळ निघून गेला...
राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३
No comments:
Post a Comment